
Nanded city: सुरक्षारक्षक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची मुजोरी; गाडीला स्टीकर नाही म्हणून रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण; नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Nanded city: सुरक्षारक्षक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची मुजोरी; गाडीला स्टीकर नाही म्हणून रहिवाशांना शिवीगाळ करत मारहाण; नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
सिंहगड रोड:
काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मधुवंती सोसायटीतील रहिवासी प्रफुल्ल सोनकवडे हे गेटजवळ आले असता गाडीला सोसायटीचे स्टीकर का नाही असे म्हणत सुरक्षारक्षकांनी हुज्जत घालत शिवीगाळ केली. त्यावेळी प्रफुल्ल सोनकवडे यांची पत्नी प्रेरणा सोनकवडे व मुलगा ओंकार सोनकवडे हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी सुरक्षारक्षक अश्विनी, सुरक्षा अधिकारी नेवरकर व इतर आठ ते दहा सुरक्षारक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या टोळीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
याबाबत प्रेरणा सोनकवडे यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रविण जाधव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. नांदेड सिटी पोलीस पुढील तपास करत आहेत.