♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘पुर्णांगीणींना’ दिला हळदीकुंकवाचा मान

पुणे: पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या महिलांना हळदीकुंकवाचा मान देत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ‘पुर्णांगीणींना’ आपलेपणाची मायेची ऊब दिली आहे. ‘ती’चा सन्मान म्हणत रुपाली चाकणकर यांनी क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान च्या माध्यमातून धायरी येथे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘समाजातील सर्व महिलांना हळदीकुंकवाचा मान मिळायला हवा. यापासून कोणीही वंचित राहू नये. समाजात विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते, त्यांना समारंभांपासून बाजूला ठेवले जाते. त्यांना प्रत्येक समारंभात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून राज्य महिला आयोगाने विधवा प्रथा बंदीसाठी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तब्बल 500 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव राज्य महिला आयोगाला पाठवलेला आहे. संपूर्ण राज्यात विधवा प्रथा बंदीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी उचलले गेलेले हे ऐतिहासिक पाऊल आहे.’

विधवा हा शब्द स्त्रियांची वेगळी ओळख करून देत होता, स्त्रीयांचे अपूर्ण असणे दाखवत होता. त्यामुळे हा भेदभाव दूर व्हावा म्हणून महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यभरात विधवा स्त्रियांना ‘पुर्णांगीणी’ हा शब्द वापरला जावा ही मागणी करण्यात आली. या पुर्णांगीणी महिलांना कोणतेही धर्मीक कार्य असेल, समारंभ आणि उत्सव असेल त्यात त्यांना सन्मान दिलाच पाहिजे!’ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लेखिका डॉ. प्रतिभा वैद्य यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्या बोलताना म्हणाल्या की, ‘महिलांचा अशा प्रकारे सन्मान पहिल्यांदाच होत आहे याचे मला समाधान आहे.’ यावेळी पूर्णांगीनी महिलांना हळदी कुंकू लावून हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles