♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गौण खनिज उत्खनन: सणसनगर येथे मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन; महसूल विभागाकडून कारवाईची अपेक्षा 

गौण खनिज उत्खनन: सणसनगर येथे मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन; महसूल विभागाकडून कारवाईची अपेक्षा 

 

सणसनगर: सर्वसामान्य नागरिकांनी घमेलभर मुरुम उकरला तरी ताबडतोब महसूल विभागाकडून दंडाच्या नोटीसा पाठविल्या जातात. सातबारा उताऱ्यावर बोजा चढविला जातो. धनदांडग्यांच्या बाबतीत मात्र याऊलट स्थिती पाहायला मिळते. त्यांच्यावर कारवाई करण्यास विलंब केला जातो किंवा पळवाटा शोधून कारवाईस टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जातो.

सणसनगर ता हवेली येथील गट नं 23 मध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करण्यात आलेले आहे. हजारो ब्रास मुरुम उकरल्याने नैसर्गिक डोंगराला पडलेले भगदाड स्पष्ट दिसत आहे. असे असताना संबंधित ठिकाणी खोदकाम झाल्याची खबर महसूल विभागापर्यंत आतापर्यंत कशी पोचली नव्हती असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतर ठिकाणी जशी तत्परतेने कारवाई होते तशी तत्परता इथे दिसून आली नाही.

हजारो ब्रास मुरुम उकरल्याचे स्पष्ट दिसत असल्याने याबाबत खातरजमा करून नियमानुसार मोजमाप करुन दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना एक नियम आणि धनदांडग्यांना वेगळा नियम असे व्हायला नको. मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles