♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Accident:सिमेंट वाहतूक करणारा बल्कर पडला बंद;सिंहगड रस्त्यावर वाहतूक खोळंबली

पुणे: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट जवळ रेडिमिक्स कॉंक्रीट प्लॅंट मधून बाहेर पडलेला बल्कर वळण घेताना मुख्य रस्त्यावर आडवा बंद पडल्याने वाहतूक खोळंबली आहे. घटनास्थळी पुणे शहर वाहतूक विभागाच्या सिंहगड रोड वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून बल्कर बाजूला काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी पांडुरंग वाघमारे यांनी दिली आहे.

नांदेड सिटी गेट जवळ मुख्य सिंहगड रस्त्याला लागून रेडिमिक्स कॉंक्रीट चे प्लॅंट असल्याने तेथे सातत्याने बल्कर व मिक्सर ची वर्दळ सुरू असते. ही वाहने तेथेच रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत असल्याने त्यांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. आज तर मुख्य सिंहगड रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणारा बल्कर वळण घेताना आडवा असताना बंद पडल्याने बऱ्याच वेळापासून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

सायंकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त आहे. नागरिकांना विरुद्ध बाजूने वाहने काढावी लागत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत अवजड वाहन असल्याने बाजूला करण्यासाठी क्रेन आणण्याशिवाय पर्याय नाही. घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी बल्कर बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी अधिकारी पांडुरंग वाघमारे यांनी दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles