♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

PMRDA चा दुसरा दणका; रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना वृक्षतोड प्रकरणी सणसनगर येथील हॅप्पी थॉट्स/मनन आश्रमाच्या विश्वस्तांविरुद्ध नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

PMRDA चा दुसरा दणका; रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना वृक्षतोड प्रकरणी सणसनगर येथील हॅप्पी थॉट्स/मनन आश्रमाच्या विश्वस्तांविरुद्ध नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

 

पुणे: बांधकाम परवानगी देताना घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन, नैसर्गिक भूभागाच्या रचनेत बदल व मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अगोदरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सणसनगर ता हवेली येथील तेज ज्ञान फाऊंडेशनच्या हॅप्पी थॉट्स/मनन आश्रम व इतर काही बांधकामांना दिलेल्या परवानग्या रद्द केलेल्या आहेत. आता पुन्हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA प्रशासनाने या संबंधितांना दुसरा दणका देत सणसनगर येथील गट नं 29 मध्ये रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना वृक्षतोड केली म्हणून नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र नागरी वस्ती वृक्ष संवर्धन व संरक्षण अधिनियम 1975 च्या कलम 21 नुसार गुन्हा दाखल केला आहे. विश्वस्त मकरंद रामदास परांजपे (रा. पुणे) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॅप्पी थॉट्स/ मनन आश्रमाकडे जाण्यासाठी नियमाप्रमाणे विहित रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी संबंधितांनी लगतच्या शेतकऱ्यांकडून रस्ता करण्यासाठी व रस्ता वहिवाटीसाठी जमीन घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान रस्त्याचे काम करताना संबंधितांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता साग, खैर, सुबाभूळ, जांभूळ व इतर काही प्रकारच्या मोठमोठ्या झाडांची कत्तल केली आहे. धक्कादायक म्हणजे वृक्षतोड केलेली कळू नये म्हणून खोड उपटून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सर्व पुरावे संबंधितांना नष्ट करता न आल्याने त्यांचा डाव फसला गेला.

याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करुन पंचनामा केला. तोडलेल्या झाडांच्या फांद्या, मुळे, उपटून टाकलेले खोड, बुंधे जागोजागी पडलेले स्पष्ट दिसून येत होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे. नांदेड सिटी पोलीस स्टेशन कडून पुढील तपास सुरू आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles