♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘परमिशन’ घेऊन हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहेत अवैध धंदे? कोण-कोण देतंय ‘संयुक्त परमिशन’?

पुणे: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे अनेक गुन्हे पोलीसांच्या दुर्लक्षामुळे तपासावविना पडून असताना दुसऱ्या बाजूला याच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने अवैध धंदे मात्र जोमात सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे अवैध धंदे सुरू करण्यासाठी पोलिस स्टेशन व आणखी एका ‘खास शाखेची’ अगोदर ‘पूर्वपरवानगी’ घेण्यात येत असल्याचे ऐकायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांच्या ‘परमिशनने’च हे गोरखधंदे सुरू असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत आहे.

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड रस्त्यावरील नांदेड ते आंबी पर्यंतच्या एकूण सतरा गावांचा समावेश आहे. हद्दीत गावं कमी असली तरी शहराला लागून असल्याने या गावांमध्ये लोकवस्ती जास्त आहे. तसेच परिसरात पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, हॉटेल, बार असल्याने शहरातील नागरिकांची वर्दळ या भागात दररोज असते. याच कारणांमुळे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे.

राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे 

गावठी दारूचे अड्डे, ताडीचे गुत्ते, गांजा विक्री, मटका, मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, प्रतिबंधित गुटखा विक्री, हॉटेल मधून अवैध देशी विदेशी मद्य विक्री, टपऱ्यांमधून नशेच्या गोळ्यांची विक्री हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्याचबरोबर, खडकवासला चौपाटी, हॉटेल, लॉजिंग, भंगार व्यवसायिक, रिक्षा चालक, सिंहगडावरील प्रवासी वाहतूक करणारी वाहने या सर्वांकडूनही दरमहा हप्ते गोळा केले जात आहेत.

हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांचे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. धक्कादायक म्हणजे एकाही वरिष्ठ अधिऱ्याचा या अवैध धंद्यांवर ‘अंकुश’ नाही उलट एका अधिकाऱ्याची वसुली करण्यासाठी ‘एक अंकुश’ हद्दीत फिरत असतो अशी माहिती ऐकायला मिळत आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याने काही नागरिकांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. आता याबाबत काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles