♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Accident News: सिंहगड रस्त्यावरील डीआयएटी जवळ कार-दुचाकीचा भीषण अपघात

पुणे: सिंहगड रस्त्यावरील Sinhagad road डीआयएटी DIAT परिसरात हॉटेल ॲक्वेरिअस जवळ आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इंडिका कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली असून यात चौघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर वेळेत मदत न मिळाल्याने गंभीर जखमी झालेले अपघातग्रस्त नागरिक सुमारे अर्धा तास रस्त्यावर पडून होते.

रविवारची सुट्टी असल्याने सिंहगड रस्त्यावर पर्यटकांची मोठी वर्दळ आहे. अशातच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इंडिका कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात भाग्यश्री जगदाळे, सर्वेश जगदाळे, सक्षम जगदाळे, सचिन जगदाळे व रोहिणी गुंड हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र जखमी व्यक्ती सुमारे अर्धा तास रस्त्यावर पडून होते. याबाबत आपत्ती व्यवस्थापन समुहाचे तानाजी भोसले, श्री चौंडे, डॉ तुषार ढेकणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत मिळण्यासाठी हालचाल केली. काही वेळानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एका गंभीर जखमीला शहरातील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

वाहतूक पोलीस कोठे होते?

शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी वाहतूक पोलीस खडकवासला धरण चौपाटी परिसरात जोडप्यांना पकडण्यासाठी ‘नेम धरुन बसलेले असतात’. एवढा मोठा अपघात झाल्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेले वाहतूक पोलीस वेळेत का पोहचले नाहीत? हा प्रश्न या अपघातग्रस्तांना मदत मिळण्यासाठी उशीर झाल्याने उपस्थित होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles