लाखोंच्या भगव्या वादळाचं अतिभव्य रुप……. सरकारने विचार करावा अजूनही वेळ गेलेली नाही!
पुणे: गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आंतरवली सराटी या जालना जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावातून पेटवलेली आंदोलनाची मशाल राज्य भरातील लाखो मराठ्यांच्या मनाला चेतना देऊन गेली आणि संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यामागे एकजीवाने उभा राहिल्याचे दिसत आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या भगव्या वादळाचं अतिभव्य रुप नगर-पुणे रस्त्यावर आज अनुभवायला मिळालं. सरकारने अंत पाहू नये, अजूनही वेळ गेलेली नाही विचार करावा!