♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

The INVESTIGATION EXPRESS ‘IMPACT’: गुंडांची दहशत दाखवून नेलेली टाटा सफारी गाडी मिळाली परत; बातमी आल्यानंतर पुणे शहर पोलीसांचा बदलला ‘सूर’; पती-पत्नी भावूक

पुणे: गुंडांची दहशत दाखवून जबरदस्तीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील स्नेहल कालिंदर पोवार यांची घरासमोरुन नेलेली टाटा सफारी गाडी अखेर सुमारे एक वर्षानंतर त्यांना परत मिळाली आहे. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने पोवार दांपत्याच्या व्यथा 14 जानेवारी 2024 रोजी मांडल्यानंतर सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडबडून जाग आली व अगोदर जबाबदारी झटकणाऱ्य अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत पोवार दांपत्याला त्यांच्या कष्टाची कमाई करत मिळवून दिली आहे. स्वतःची लक्ष्मी पुन्हा दारात आल्यानंतर भावूक झालेल्या पोवार दांपत्याने ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ चे आभार मानले आहेत.

स्वामी समर्थांचे पेंटींग तयार करुन त्याची विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवत असलेल्या स्नेहल पोवार यांची 2020 साली कात्रज परिसरातील एका व्यक्तीशी ओळख झाली होती. ओळख वाढल्यानंतर त्या व्यक्तीने व्यवसायासाठी पोवार यांच्याकडे कोठून तरी दीड कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार पोवार यांनी त्या व्यक्तीची फायनान्स कन्सल्टंट शी ओळख करून परस्परांशी व्यवहार ठरवून घेण्याचा सल्ला दिला. त्या संदर्भात संबंधित व्यक्ती व फायनान्स कन्सल्टंट यांच्यात सामंजस्य करार ही झाला होता. मात्र अचानक तुम्ही ओळख करुन दिलेल्या फायनान्स कन्सल्टंट ने माझी दीड लाख रुपये फसवणूक केली आहे असे म्हणत तुम्ही आता माझे पैसे द्या असा पोवार यांच्याकडे तगादा लावला. 8 फेब्रुवारी 2023 रोजी संबंधित व्यक्ती गुंडांना सोबत घेऊन पोवार यांच्या राहत्या घरी आली व दहशत निर्माण करुन जबरदस्तीने टाटा सफारी गाडी घेऊन गेली.

घाबरलेल्या पोवार यांनी सातत्याने त्या व्यक्तीकडे गाडी परत देण्यासाठी विनवण्या केल्या परंतु तो दाद देत नव्हता. पोवार दांपत्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या वडगाव पोलीस चौकीत अनेक वेळा जाऊन याबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील अधिकारी व कर्मचारी दखल घेत नव्हते. ॲड. सचिन गोगावले यांच्या सल्ल्यानुसार अखेर पोवार यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोवार यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’कडे आपल्या व्यथा मांडल्या. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली. बातमी आल्यानंतर उद्धटपणे पोवार यांच्याशी बोलणाऱ्या वडगाव पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सूर बदलला आणि त्यांनी पोवार यांना त्यांची गाडी परत देण्याची व्यवस्था केली. आपली लक्ष्मी परत मिळाल्यानंतर पोवार दांपत्य भावूक झाले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles