
श्री रामेश्वर नागरि सहकारी पतसंस्थेच्या प्रचारात ‘श्री रामेश्वर पॅनल’ची आघाडी;सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चार उमेदवारांची बिनविरोध निवड
श्री रामेश्वर नागरि सहकारी पतसंस्थेच्या प्रचारात ‘श्री रामेश्वर पॅनल’ची आघाडी;सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चार उमेदवारांची बिनविरोध निवड
नांदेड: श्री रामेश्वर नागरि सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारात श्री रामेश्वर पॅनल’ने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, शिवणे-उत्तमनगर येथील सभासदांचा प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक संचालकपदाच्या निवडणूकीच्या प्रचार दौऱ्यात नांदेड गावातील ग्रामदैवत वडजाई मातेच्या मंदिरात प्रचार बैठक घेण्यात आली.32 वर्षांपूर्वी 27000 रुपये भाग भांडवलावरून सुरू झालेली संस्था आज सुमारे 65 कोटी पर्यंत पोहोचविण्यात श्री रामेश्वर पॅनलच्या सर्व ज्येष्ठ संचालक, आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांचा मोठा वाटा असल्याचे अनेक मान्यवरांनी यावेळी बोलून दाखवले.
श्री रामेश्वर नागरि सहकारी पतसंस्था स्थापनेपासून विद्यमान संचालकांच्या विश्वासार्हतेमुळे नावारुपास आली आहे. त्यामुळे सर्व भाग भांडवलदारांच्या विश्वासावर श्री रामेश्वर पॅनलच्या सर्व संचालक पदाच्या उमेदवारांनी निर्धास्त राहण्याचे आश्वासन नांदेड ग्रामस्थांनी दिले.
रुपये 10,000 पासून ते तब्बल 50 लाख रुपयांचे कर्ज रामेश्वर पतसंस्था देण्यास कशी मदत करते, विनासायास कर्ज वितरण कसे होते, सर्व संचालकांची आदरपूर्वक वागणूक आदी अनेक विषयांवर कर्जदारांनी बँकेवर व विद्यमान संचालकांवर स्तुतीसुमने उधळली.
नांदेड गावच्या हद्दीतील पतसंस्था ही आमच्या घरची पतसंस्था असुन सर्व सभासद हे सधन असून समाजातील अनेक मान्यवर संस्थांवर काम करीत असल्याने येणाऱ्या काळात ही पतसंस्था 100 कोटींचा टप्पा गाठेल अशी आशा व्यक्त करीत श्री रामेश्वर पॅनलचे सर्व संचालक हे पतसंस्था सांभाळण्यास सक्षम असून ते सचालक समाजसेवा करण्यासाठी या संस्थेत असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आणि सर्व नांदेड ग्रामस्थांनी आपला पाठिंबा श्री रामेश्वर पॅनलच्या सचिन दशरथ दांगट, विकास पंढरीनाथ दांगट, अभिजित सोपान घुले, बाळासाहेब काळुराम घुले, बाळासाहेब अर्जुनराव हगवणे, राजेंद्र गणपत हगवणे, देविदास एकनाथ लगड, विलास साधू मते व राजेश शंकर देवकर यांना असल्याचे सांगितले. श्री रामेश्वर पॅनलच्या विनादेवी विजय मते, मनिषा भगवान मोरे, विकास रामदास कोल्हे व नागेश सोपान शिंदे चार उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे.
प्रचाराच्या या बैठकीस नांदेड गावचे माजी सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे,सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, सभासद मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दि 27 एप्रिल 2025 रोजी नांदेड फाटा येथील गणेश मंगल कार्यालयात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.