♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पोलीस बसलेले असताना डोळ्यासमोर अवजड वाहतूक सुरू; अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण मौन’; किरकटवाडी परिसरातील नागरिक हैराण

पुणे: सकाळी व संध्याकाळी किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश असताना व त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याचे कर्मचारी बसलेले असताना त्यांच्या डोळ्यासमोर अवजड वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हप्ते चालू असल्याने ही हवजड वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे का? आणि जर तसे नसेल तर पोलीस कारवाई का करत नाहीत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान कनिष्ठ ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवजड वाहतुकीवरील कारवाईबाबत ‘अर्थपूर्ण मौना’मुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहेत.

नोकरदार, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी यांची अवजड वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीने होणारी गैरसोय टाळण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 सकाळी साडेआठ ते अकरा व सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केलेले असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीसांवर सोपविण्यात आलेली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर हवेली पोलीस ठाण्याकडून सदर आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती मात्र काही दिवस दिखावा झाल्यानंतर पुन्हा कारवाई मंदावली असून पोलीस कर्मचारी बसलेले असताना त्यांच्या डोळ्यासमोर अवजड वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे.

याबाबत अनेक वेळा हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी संपर्क करुन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे, मात्र संबंधितांना याबाबत गांभीर्य असल्याचे दिसत नाही. धक्कादायक म्हणजे अवजड वाहतूकीच्या विरोधात बातम्या येऊ नयेत म्हणून पोलीस अधिकारी माध्यमांकडे ‘फिल्डींग’ लावताना दिसत आहेत. त्यामुळे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा उलटा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles