♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

CWPRS Security Scam: सीडब्ल्युपीआरएस मध्ये झालेल्या त्या घोटाळ्याचे पुढे काय झाले? कोण कोण होतं सामील?

पुणे: सुरक्षारक्षक व सुरक्षा सुपरवायझर यांची बनावट पगार पत्रके तयार करुन त्या आधारे केंद्र शासनाची लाखो रुपये फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही वर्षांपूर्वी खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेत(सीडब्ल्युपीआरएस) उघडकीस आला होता. संबंधित विभागाचे अधिकारी व सुरक्षा एजन्सी यांनी संगनमताने ही लाखो रुपयांची लूट केल्याचे प्रथमदर्शनी उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येत होते. याबाबत चौकशी समितीही नेमण्यात आली होती.

22 जुलै 2020 ते 26 जुलै 2021 या कालावधीसाठी 36 सुरक्षारक्षक व 4 सुपरवायझर नेमण्याचे काम महाराष्ट्र सर्व्हिसेस ब्युरो या सुरक्षा एजन्सीला देण्यात आले होते. संबंधित सुरक्षा एजन्सीकडून कामगारांना करारातील रकमेपेक्षा कमी पगार देण्यात येत होता मात्र सीडब्ल्युपीआरएस कडे पगार पत्रके सादर करताना त्यावर नियमानुसार पगार दाखवून पूर्ण पैसे काढण्यात येत होते. धक्कादायक म्हणजे शासनाकडे सादर करण्यात येत असलेल्या कागदपत्रांवर खोटी माहिती सादर करण्यात येत होती.

तत्कालीन सुरक्षारक्षकांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर त्यांना कामावरुन काढण्याची धमकी देण्यात आली तसेच अनेकांना कामावरून काढूनही टाकण्यात आले. दबाव वाढल्यानंतर याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली. संबंधित सुरक्षा एजन्सीची अनामत रक्कम थांबवून ठेवण्यात आली. सुरक्षा एजन्सीकडून सुरक्षा रक्षक व सुपरवायझर यांना फरकाची रक्कम देण्यात आली. परंतु ऐतिहासिक वारसा असलेल्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील एवढ्या मोठ्या संस्थेत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती . तसेच सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांवर नजरेआड चालणारे काळे कारनामे चव्हाट्यावर आले होते.

अजूनही अनुत्तरीत असलेले प्रश्न

•संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय हा घोटाळा करणे शक्य होते का?

•पगार पत्रके बनावट आहेत की खरी हे तपासण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांचे नव्हते काय?

•दोषी सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही?

•चौकशी पूर्ण होण्यास विलंब का होत आहे?

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles