♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पुणे अन्नधान्य वितरण कार्यालयाची गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक व साठवणुकीवर मोठी कारवाई;35 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

पुणे: पुणे अन्नधान्य वितरण कार्यालयाने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे बुधवारी छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करत तब्बल 35 लाख 73 हजार 545 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे. दरम्यान या कारवाईमुळे काळे धंदे करणाऱ्या गॅस एजन्सी धारकांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले 105 सिलेंडर व रिकामे 602 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी भिकचंद हिरालाल कात्रेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख, सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी ही कारवाई केली केली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles