
Chetak Electric scooter Accident: JC Motors नऱ्हे येथील शोरुम कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा बेतला असता तरुणाच्या जीवावर; सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे गाडी सुरू असताना मागचे चाकच गेले निघून
पुणे: महेश राजेंद्र निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी JC Motors येथे आपली एक वर्षापूर्वी घेतलेली चेतक इलेक्ट्रॉनिक स्कूटर सर्व्हिसिंग साठी दिली होती. काल ते गाडी घेऊन येत असताना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे अचानक मागचे चाक निघून गेले. महेश निंबाळकर रस्त्यावर पडले. गाडी घसरत दुर पर्यंत गेली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कामगारांवर व शोरुम चालकावर कारवाई करण्याची मागणी निंबाळकर यांनी केली आहे.