खडकवासला येथे पालिकेच्या दुटप्पी कारभाराचे पितळ उघडे; जिथे गरज तिथे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित तर दुसरीकडे गरज नसताना आदल्या दिवशी खोदकाम आणि दुसऱ्या दिवशी कॉंक्रीटीकरण सुद्धा पूर्ण!
खडकवासला येथे पालिकेच्या दुटप्पी कारभाराचे पितळ उघडे; जिथे गरज तिथे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित तर दुसरीकडे गरज नसताना आदल्या दिवशी खोदकाम आणि दुसऱ्या दिवशी कॉंक्रीटीकरण सुद्धा पूर्ण!
खडकवासला: ‘मार्च एंड आणि उडवा फंड’
खडकवासला बाह्यवळण रस्त्याजवळ मुख्य सिंहगड रस्त्याला समांतर सुमारे पन्नास ते शंभर मीटर लांबीचा व सुमारे दोन मीटर रुंदीचा रस्ता अत्यंत घाईघाईने व गरज नसलेल्या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक खोदकाम करण्यात आले व लगेच दुसऱ्या दिवशी खोदकाम केलेल्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटीकरण करुन रस्ता तयार करण्यात आला. अशा प्रकारे झालेल्या कामाचा दर्जा काय असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गरज नसलेल्या ठिकाणी अशाप्रकारे विनाकारण निधीची लूट सुरू आहे. ज्या ठिकाणी खरी गरज आहे तो शीव रस्ता मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तर नाहक खर्च करुन अशाप्रकारे कामांचा घाट घातला जात आहे. सध्या ‘मार्च एंड’ सुरू असून तातडीने बिलं निघत असल्याने ठेकेदारांमध्ये कामं मारण्याची तर अधिकाऱ्यांमध्ये टक्केवारी गोळा करण्याची स्पर्धा लागलेली दिसत आहे.