
धक्कादायक…. किरकटवाडी येथील सोसायटीच्या पाणी तपासणीत आढळले GBS चे जीवाणू; पाण्यामुळे आजार पसरला नसल्याचा पालिका अधिकाऱ्यांचा दावा ठरला खोटा; परिसरात भीतीचे वातावरण
धक्कादायक…. किरकटवाडी येथील सोसायटीच्या पाणी तपासणीत आढळले GBS चे जीवाणू; पाण्यामुळे आजार पसरला नसल्याचा पालिका अधिकाऱ्यांचा दावा ठरला खोटा; परिसरात भीतीचे वातावरण
किरकटवाडी
किरकटवाडी व परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुइलेन बॅरे सिंड्रोम(GBS) आजार पसरला असून काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेत असलेल्या काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दुसऱ्या बाजूला पालिकेचे बेजबाबदार वरिष्ठ अधिकारी हा आजार पाण्यामुळे पसरला नसल्याचे बेजबाबदारपणे सांगत होते.
नागरिकांकडून दुषित पाण्याबाबत संताप व्यक्त होत असल्याने अखेर परिसरातील विहिरी, आर.ओ. प्लॅंट, टॅंकर भरणा केंद्रे व सोसायट्यांमधील नळाला येणारे पाणी येथील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील बहुतांश ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे तर मोरया स्पर्श सोसायटीतील नळाच्या पाण्यात GBS चे जीवाणू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
त्याच विहिरीतून होतो पाणीपुरवठा
मोरया स्पर्श सोसायटी किरकटवाडी गावच्या हद्दीत असून नांदेड येथील पाणीपुरवठा विहिरीतूनच येथे पाणीपुरवठा केला जातो. याच पाण्यात जीबीएस चे जीवाणू आढळून आले आहेत. त्यामुळे विहिरीच्या पाण्यामुळेच आजार पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.