♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

MPDA Act: सराईत गुन्हेगार कार्तिक लोणारे याच्यावर MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई; नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मंजुरी 

MPDA Act: सराईत गुन्हेगार कार्तिक लोणारे याच्यावर MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई; नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मंजुरी 

 

पुणे: नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार कार्तिक बाळकृष्ण लोणारे (वय 23, रा. खडक चौक, लोणारे वस्ती, रामदेव कलेक्शन च्या वर, धायरी,पुणे) याच्यावर MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. नांदेड सिटी पोलीसांनी याबाबत तयार केलेल्या प्रस्तावाला पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी दिली आहे.

सराईत गुन्हेगार कार्तिक लोणारे याच्या विरुद्ध विनापरवाना घातक शस्त्र बाळगणे, खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याकडून सातत्याने गुन्हेगारी कृत्ये होत आहेत व यापुढेही तो मोठे गुन्हे करण्याची शक्यता लक्षात घेऊन नांदेड सिटी पोलीसांनी ही प्रतिबंधक कारवाई केली आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत. त्यानुसार सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार व नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हिलान्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम व पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, विजय विरणक यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. यापुढेही हद्दीतील गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशाच कठोर कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles