♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Impact: नांदेड सिटी वाहतूक विभागाचा दणका; नियम मोडून किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर अवजड वाहतूक आढळल्यास थेट खाण चालकांवर होणार कारवाई 

Impact: नांदेड सिटी वाहतूक विभागाचा दणका; नियम मोडून किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर अवजड वाहतूक आढळल्यास थेट खाण चालकांवर होणार कारवाई 

 

किरकटवाडी

: जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडून किरकटवाडी – नांदोशी रस्त्यावर अवजड वाहतूक सुरू असल्याचे आढळ्यास ज्या खाणीतून संबंधित डंपर भरुन आलेला असेल त्या खाण चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नांदेड सिटी वाहतूक विभागाने नांदोशी येथील खाणचालकांना याबाबत नोटीसा बजावल्या आहेत.

नांदेड सिटी वाहतूक विभागाने दिलेल्या नोटीसमध्ये सकाळी 7 ते 12 व सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत किरकटवाडी – नांदोशी रस्त्यावर अवजड डंपर वाहतूक सुरू ठेवू नये असे डंपरमालक व खालचालकांना सूचित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरिही जर नियम मोडून अवजड वाहतूक सुरू असल्याचे आढळ्यास ज्या खाणीतून संबंधित डंपर भरुन आलेला असेल त्या खाणचालकावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

किरकटवाडी गावातील रस्ता अरुंद आहे. सकाळी शालेय विद्यार्थी, नोकरदार यांची वर्दळ असते. नेमके त्याच वेळी अवजड डंपरची रांग लागून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याचा सर्वांना मनःस्ताप सहन करावा लागतो. नागरिक याबाबत सातत्याने तक्रारी करत आहेत मात्र पोलीस प्रशासन दखल घेत नव्हते. आता हा भाग शहर आयुक्तालयाच्या हद्दीत आलेला असल्याने नांदेड सिटी वाहतूक पोलीसांनी खाण चालकांना नोटिसा बजावल्या आहेत. वाहतूक पोलीस खरंच कारवाई करतात की नोटीस कागदावरच राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

preload imagepreload image
19:24