♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला धरणामागे नांदेड सिटी पोलीसांचा छापा;105 लिटर गावठी दारू जप्त;एकावर गुन्हा दाखल 

खडकवासला धरणामागे नांदेड सिटी पोलीसांचा छापा;105 लिटर गावठी दारू जप्त;एकावर गुन्हा दाखल 

 

खडकवासला: अवैध धंद्यांच्या विरोधात नांदेड सिटी पोलीसांची सातत्याने कारवाई सुरू असून काल सायंकाळी खडकवासला धरणामागे स्मशानभूमीच्या बाजूला छापा टाकून तब्बल 105 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत विजय सौदागर पवार (वय 48, रा. आझाद तरुण मंडळ चौक, खडकवासला,पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकवासला धरणामागे असलेल्या मोकळ्या जागेत अवैध धंद्यांचं साम्राज्य होतं. हा भाग नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत आल्यापासून सातत्याने कारवाया करत येथील अवैध धंदे नष्ट करण्यात आले आहेत. तरिही काही अवैध धंदेवाले अद्यापही चोरुन लपून अवैध धंदे करत आहेत. माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस या अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत.

काल स्मशानभूमीच्या बाजूला मोकळ्या जागेत एकजण गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड सिटी पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन मोठ्या ड्रममध्ये भरलेली तब्बल 105 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

भट्टी का सापडत नाही?

मागील काही दिवसांपासून खडकवासला येथे नांदेड सिटी पोलीसांनी तसेच खडकवासला, डोणजे, मणेरवाडी, माताळवाडी या भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत गावठी दारू जप्त केली आहे व अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तयार गावठी दारू सापडत आहे तर मग ही दारु तयार होणारी भट्टी का सापडत नाही? संबंधित पोलीस, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी सखोल तपास का करत नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रालगत भट्टया असण्याची शक्यता 

गावठी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव व इतर लगतच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या गावठी दारुच्या भट्टया असण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी ओसाडे गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यालगत तब्बल आठ हजार लिटर कच्च्या गावठी दारुचा साठा आढळून आला होता. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने याबाबत गांभीर्याने तपास करुन अशा गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टया शोधून उध्वस्त करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles