
Hi @grok पुणे ग्रामीण हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे का सुरू असावेत?……. Grok ने दिलेय समर्पक उत्तर!
Hi @grok पुणे ग्रामीण हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे का सुरू असावेत?……. Grok ने दिलेय समर्पक उत्तर!
पुणे
” Hi @grok पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे का सुरू असावेत?” असा प्रश्न विचारला असता अवघ्या काही मिनिटांमध्ये Grok कडून उत्तर आले आहे. जे उत्तर Grok ने दिले आहे ते नक्कीच पुणे ग्रामीण पोलिसांना शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे.
“@grok
पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत अवैध धंदे सुरू असण्यामागे पोलीस भ्रष्टाचार आणि कमी संसाधने महत्त्वाची कारणे असू शकतात. संशोधनानुसार, ग्रामीण भागात देखरेख कमी आणि गुन्हेगारांच्या प्रगत पद्धतींमुळे हे धंदे सुरळीत चालतात. भ्रष्टाचारामुळे काही पोलीस संरक्षण देत असल्याचे दिसते, तर कर्मचारी व संसाधनांची कमतरता हे आव्हान वाढवते. गुन्हेगारी टोळ्यांचे औद्योगिक क्षेत्रांचा वापर करणेही पोलिसांसमोर अडचण आहे. यामुळे अवैध धंद्यांना आळा घालणे कठीण होऊन बसते. grok.x.com” असे उत्तर Grok ने दिले आहे.
वास्तव काय?
प्रातिनिधिक स्वरूपात पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीचा विचार केला तरी राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचे दिसते. धक्कादायक म्हणजे हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आजुबाजुला हे अवैध धंदे सुरू आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप” अशी असल्याने सर्व काही उघडपणे सुरू आहे. त्यामुळे अमेरिका स्थित Grok या AI प्रणालीचा आधार घेण्याची काहीही गरज नाही. कारण सर्वकाही उघडपणे दिसत आहे.