♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘तो’ इथला बाप आहे….आमच्या नादाला लागायचं नाही, लागलं तर आम्ही सोडणार नाही; खडकवासला येथील अल्पवयीन तरुणावरील हल्ला पूर्ववैमनस्यातून;चार अल्पवयीन आरोपी ताब्यात अजून चार फरार

‘तो’ इथला बाप आहे….आमच्या नादाला लागायचं नाही, लागलं तर आम्ही सोडणार नाही; खडकवासला येथील अल्पवयीन तरुणावरील हल्ला पूर्ववैमनस्यातून;चार अल्पवयीन आरोपी ताब्यात अजून चार फरार

खडकवासला: 12 मार्च 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरण चौपाटीजवळ अल्पवयीन तरुणावर दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी धारधार शस्त्र, दांडके,दगडांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे कारण समोर आले असून. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे दाखल तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राज जाधव (रा. चांभार आळी, खडकवासला) व रामभाऊ सोनवणे (रा. खडकवासला धरणामागे) या दोघांसह आणखी दोन आरोपी फरार आहेत तर चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या नकुल भिमा चव्हाण (रा. लमाणवस्ती खडकवासला) याच्यावर उपचार सुरू आहेत.
नकुल चव्हाण याच्या अल्पवयीन मित्राने दिलेल्या फिर्यादीनुसार नकुल आणि तो गॅस शेगडी आणण्यासाठी खडकवासला चौपाटी येथील दुकानावर गेले होते. त्यावेळी राज जाधव व इतर पाच ते सहा जण तीन दुचाकीवरून हातात शस्त्र घेऊन तेथे आले. त्यांना पाहून नकुल व त्याच्या मित्राने तेथून पळ काढला मात्र काही अंतरावर त्यांनी नकुलला गाठले व धारधार शस्त्र, दांडके, मोठे दगड उचलून त्याच्यावर हल्ला केला. नकुलचा मित्र जवळचा लपला होता. अचानक हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली व तेथील इतर नागरिकांनी घाबरून पळ काढला.
नकुलला मारत असताना राज जाधव मोठ्याने,” रामभाऊ सोनवणे इथला बाप आहे. आमच्या नादाला लागायचं नाही, लागलं तर आम्ही सोडणार नाही”असे म्हणत होता. यावरुन राज जाधव, रामभाऊ सोनवणे व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तर राज जाधव, रामभाऊ सोनवणे व इतर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. नांदेड सिटी पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव याबाबत अधिक तपास करत आहेत.

अवैध धंदे, गुन्हेगारी आणि वर्दीतील आका….. खडकवासला परिसरातील भयान वास्तव!

खडकवासला परिसरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली असून जाणीवपूर्वक गुन्ह्यांसाठी अल्पवयीन गुन्हेगारांचा वापर केला जात आहे. यातील बहुतांश गुन्हेगार हे नशेच्या विळख्यात अडकलेले असून अवैध धंदेवाले त्याचा गैरफायदा घेत आहेत. धक्कादायक म्हणजे खाकी वर्दीतील तो आका हप्त्यासाठी इमान विकून या अवैध धंदे वाल्यांना पाठीशी घालत होता. राजरोसपणे गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत असताना हा आका त्यांच्याकडे गणपतीच्या आर्त्या करण्यासाठी जात होता. पोलीस आणि अवैध धंदे वाल्यांची युती झाल्याने कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता मात्र ही हद्द शहर आयुक्तालयात आल्याने नांदेड सिटी पोलीसांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. अवैध धंदे उध्वस्त करण्यात येत असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

डाव फसला का?

गुन्हा घडला ते ठिकाण शहर व ग्रामीण पोलीसांच्या सीमेलगत आहे. अवघ्या काही फूट अंतरावर ग्रामीणची म्हणजे हवेली पोलीसांची हद्द आहे. या गुन्हेगारांना हा हल्ला ग्रामीण हद्दीत करायचा होता का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण हवेलीची हद्द असली की हवं तसं करुन घेता येतं असं वास्तव आहे. कदाचित डाव फसला असावा?

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

preload imagepreload image
07:08