
नाम फाऊंडेशनचा पुढाकार आणि लॅंडमार्क लिमिटेड कंपनीची मदत; सिंहगड खोऱ्यातील आर्वी गावासाठी विहिरीचे काम सुरू
नाम फाऊंडेशनचा पुढाकार आणि लॅंडमार्क लिमिटेड कंपनीची मदत; सिंहगड खोऱ्यातील आर्वी गावासाठी विहिरीचे काम सुरू
पुणे: ऐतिहासिक सिंहगडाच्या कुशीत असलेल्या आर्वी गावात सध्या पाणी टंचाई जाणवत आहे. वाढती लोकवस्ती व परिसरात वाढत असलेल्या उद्योग व्यवसायांमुळे सद्यस्थितीत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण येत आहे. याची दखल नाम फाऊंडेशनने घेतली असून लॅंडमार्क लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून आर्वी गावासाठी विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे.
आर्वी गावचे सरपंच सागर नवघणे, चेतन जाधव आणि अरुण घोगरे यांनी नाम फाऊंडेशनने अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी संपर्क साधून नामच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंदर्भात उपक्रम राबविण्याची मागणी केली होती. त्याला नाना पाटेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लॅंडमार्क लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून विहिरीचे काम सुरू केले आहे.
आज परिसरातील महिला भगिनींच्या हस्ते विहिरीच्या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ,तालुका समन्वयक अरुण घोगरे,सरपंच सागर नवघणे, माजी सरपंच चेतन जाधव, उपसरपंच सपना कोंडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सणस, माजी चेअरमन बाळासाहेब घाटे, संचालक सुरेश तावरे, नाम फॉउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, निलेश जावळकर, अरुण गिरी, मार्गदर्शक शिवाजी घाटे, दिलीप नवघणे, बाबाजी घोगरे, रामदास घोगरे, संतोष भोईटे, अनिल घोगरे, किरण नवघणे, माऊली नवघणे, दत्तात्रेय नवघणे, पांडुरंग नवघणे, दिनकर नवघणे, शंकर नवघणे, प्रवीण शिंदे, दत्तात्रय शिंदे, प्रीतम नवघणे, किरण यादव, कविता भोईटे, सीमाघोगरे, धनश्री नवघणे आदी उपस्थित होते.