♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तब्बल 260 लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त; नांदेड सिटी पोलीसांची खडकवासला येथे धडक कारवाई;निर्ढावलेल्या अवैध धंदे वाल्यांना दणका 

तब्बल 260 लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त; नांदेड सिटी पोलीसांची खडकवासला येथे धडक कारवाई;निर्ढावलेल्या अवैध धंदे वाल्यांना दणका 

 

खडकवासला: खडकवासला येथील लमाणवस्ती परिसरात बायपास रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेत नांदेड सिटी पोलीसांनी छापा टाकत एकदोन नव्हे तर तब्बल 260 लिटर तयार गावठी दारू भरलेले सात ड्रम जप्त केले आहेत. अवैध धंद्यांच्या विरोधात नांदेड सिटी पोलीसांनी सातत्याने धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. या कारवाईमुळे निर्ढावलेल्या अवैध धंदे वाल्यांना दणका बसला असून कारवाईचा इशारा देऊनही चोरुन लपून धंदे करणारांना चाप बसणार आहे.

नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार भाऊराव डापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी ऋषिकेश राजेश सुर्वे (वय 20) व रमेश मोहन चव्हाण (वय 40, दोघेही राहणार लमाणवस्ती, खडकवासला, सिंहगड रोड) यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ऋषिकेश सुर्वे याला नोटीस देण्यात आली असून फरार आरोपी रमेश चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहेत.

खडकवासला बाह्यवळण रस्त्यालगत मोकळ्या जागेत आडोशाला काही इसम मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी चा साठा घेऊन थांबल्याची माहिती नांदेड सिटी पोलीसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई करत 260 लिटर गाठी तयार हातभट्टी दारुचे सात ड्रम जप्त केले. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस हे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून धडक कारवाया करत आहेत. अवैध धंद्यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी अत्यंत कडक पवित्रा घेतला असल्याचे कारवायांवरुन दिसून येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles