
सामाजिक संस्था आणि समाजकार्याचा आव आणून दुसऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्यांना भयंकर झटका; सणसनगर येथील येथील बांधकामांच्या परवानग्या PMRDA ने केल्या रद्द; लोकांना उपदेश देणारांवरच आत्मचिंतन करण्याची वेळ!
सामाजिक संस्था आणि समाजकार्याचा आव आणून दुसऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्यांना भयंकर झटका; सणसनगर येथील येथील बांधकामांच्या परवानग्या PMRDA ने केल्या रद्द; लोकांना उपदेश देणारांवरच आत्मचिंतन करण्याची वेळ!
पुणे: सिंहगड रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या सणसनगर (ता हवेली) येथील पॅम रिअलिटी यांच्या गट नं 23 पै. व तेज ज्ञान फाऊंडेशन (Tej Gyan foundation)/मनन आश्रम च्या गट नं 28 पै.व गट नं 43पै. मधील बांधकामांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. अटी शर्थींचा भंग करत व पर्यावरणीय नियमांना पायदळी तुडवत तसेच शासनाची दिशाभूल करत मिळविलेल्या बांधकाम परवानग्या रद्द करण्यात आल्याने सामाजिक संस्था आणि समाजकार्याचा आव आणून “अजब कथनी और गजब करणी”चा प्रत्यय देणारांवर आत्मचिंतन करण्याची वेळ काळाने आणली आहे.
तथाकथित हॅपी थॉट्स/मनन आश्रम चे तथाकथित पदाधिकारी गणेश वसंत कडू व विशाल जगन्नाथ सकट या दोन कुप्रवृत्तीच्या व सोज्वळतेचा आव आणणाऱ्या समाजकंटकांनी पत्रकारितेला बदनाम करण्यासाठी कुभांड रचून, कट करुन, संगणमत करुन, सामाजिक वलयाचा आधार घेऊन खोटे, निराधार, बिनबुडाचे आरोप करत जबाब दिल्याचे 26 जुलै 2024 रोजी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कळले होते. समाज ज्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघतो व समाजाची जेथे आस्था असते अशा संस्थेच्या पदाधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेत नाहक निष्पाप नागरिकांना बदनाम करणे ही कृती करणारे केवळ समाजकंटकच असू शकतात. अशांना अद्दल घडविणे आवश्यक होते!
दुसऱ्यांवर खोटे आरोप करणाऱ्यांच्या बुडाखाली असलेला अंधार PMRDA प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. गट नं 23, 28 व 43 मधील बांधकाम परवानग्या, सुधारित बांधकाम परवानग्या यामध्ये करण्यात आलेली प्रशासनाची दिशाभूल व अटी शर्थींचा झालेला भंग दाखवून देण्यात आला. त्याची गंभीर दखल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ योगेश म्हसे यांनी सुनावणीदरम्यान घेतली व तातडीने सर्व बांधकाम परवानग्या रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गट नं 23, 28 व 43 मधील बांधकामांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत. असंगाशी संग करुन सर्वसामान्य नागरिकांना बदनाम करण्यासाठी कट रचने किती अंगलट येते याची प्रचिती संबंधितांना आली आहे.
त्यांनी परस्पर उद्योग केला?
दरम्यान काही दिवसांपूर्वी आश्रमाच्या संबंधित दोन व्यक्ती घरी आल्या व जे काही झाले ते चुकीचे आहे त्याबद्दल आम्ही हात जोडून माफी मागतो असे म्हणू लागले. तसेच गणेश कडू व विशाल सकट या दोघांनी परस्पर हा उद्योग केला असे सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेश वसंत कडू व विशाल जगन्नाथ सकट यांनी वैयकीय म्हणून नाही तर हॅप्पी थॉट्स/मनन आश्रमाचे पदाधिकारी असं म्हणत ते खोटे जबाब दिल्याचे संबंधितांना सांगण्यात आले आणि जर त्या दोन समाजकंटकांनी परस्पर असे खोटे कटकारस्थान केले होते तर लोकांना सत्य वचन शिकविणाऱ्या आश्रमाने यांना आजपर्यंत पाठीशी का घातले? असा सवाल त्यांना करण्यात आला. कारण 26 जुलै 2024 रोजीच याबाबत सविस्तर ईमेल करुन, रजिस्टर पत्रव्यवहार करुन तेज ज्ञान फाऊंडेशनला कळविण्यात आले होते. त्यामुळे अशा समाजकंटकांना जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे का?अशी शंका उपस्थित होत आहे.