♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाला; नांदेड सिटी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल 

खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाला; नांदेड सिटी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल 

 

खडकवासला: खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गौरव रोशन सिंग (वय 18, सध्या रा. जांभुळवाडी पुणे मूळ रा. बिहार) असे संबंधित तरुणाचे नाव असून याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नांदेड सिटी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून कालव्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला गौरव इतर दोन नातेवाईकांसह आज सुट्टी असल्याने खडकवासला धरणामागे कालव्यात पोहण्यासाठी आला होता. गौरवला पोहता येत नव्हते. इतर दोघे नातेवाईक पोहत असताना गौरव पाण्यात उतरला परंतु पाण्याला वेग असल्याने काही क्षणांत तो दिसेनासा झाला. इतर दोघांनी आरडाओरड करत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही.

याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस स्वतः पोलीस अंमलदार परमेश्वर नरवडे, अमित साळुंखे,शुभम चव्हाण, मनोज खराडे, भिमराज गांगुर्डे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे जवान अतुल रोकडे, परमेश्वर राठोड, शुभम मिरगुंडे, प्रतिक शिरसाठ व राहुल शिरोळे बुडालेल्या गौरवचा शोध घेत आहेत. सध्या पूर्ण क्षमतेने उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने पाण्याला वेग जास्त आहे. विविध उपकरणांच्या साहाय्याने कालव्यात शोधमोहीम राबवली जात आहे.

(अग्निशमन दलाचे जवान शोध घेत असून पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते)

 

काळजी घेण्याचे आवाहन 

सध्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले असल्याने कालव्यात पोहण्यासाठी न उतरण्याचे व पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles