
IMPACT: किरकटवाडी येथील अंतर्गत रस्त्याची पालिकेकडून दुरुस्ती;द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाकडून दखल
IMPACT: किरकटवाडी येथील अंतर्गत रस्त्याची पालिकेकडून दुरुस्ती;द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाकडून दखल
किरकटवाडी: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर किरकटवाडी येथील नानासाहेब नगर रस्त्याची पालिकेच्या पथ विभागाने दुरुस्ती करुन घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक आयोजित केली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष विकास हगवणे यांनीही या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
किरकटवाडी येथील नानासाहेब नगर परिसरात मोठी लोकवस्ती आहे. या परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले होते. सातत्याने दुचाकी घसरून अपघात होत होते. याबाबत परिसरातील रहिवाशांनी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून व्यथा मांडली होती.
12 फेब्रुवारी 2025 रोजी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत बातमी केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून घेतली होती. अखेर आज पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करुन घेतली आहे. अनेक दिवसांपासून हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.