
ज्या छडीने घडवले ती छडी पुन्हा द्या ! तब्बल वीस वर्षांनी भरलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे भावनिक आग्रह !
ज्या छडीने घडवले ती छडी पुन्हा द्या ! तब्बल वीस वर्षांनी भरलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे भावनिक आग्रह !
पुणे
ज्या छडीने आयुष्य घडविले ती छडी पुन्हा एकदा हातावर द्या! असा भावनिक आग्रह माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केला. शिक्षकांनीही छडी देऊन आग्रह मान्य केला. दैनंदिन परिपाठ, गणित-इंग्रजीचे तास झाले. वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये गप्पागोष्टी झाल्या. सर्व शिक्षक व शिक्षिकांसह, कर्मचाऱ्यांचाही माजी विद्यार्थ्यांनी सन्मान केला. शाळेला भेट वस्तू दिली. सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थी, शिक्षकांनी भावनिक होऊन मनोगत व्यक्त केले.
कार्याक्रमाच्या नियोजनासाठी वर्षा वाडेकर, कीर्तीवर्धन तांदळे, नम्रता भरेकर, हर्षल निकम, स्वाती उभे, कामिनी वाडेकर, अमोल सुतार, रविराज पवार, ज्योती ढेबे यांची समिती बनविण्यात आली होती. संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच माजी नगरसेवक विकास दांगट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोहन तांबडे, मोहन कांबळे, डी.आर. जाधव, उदय सुपेकर, सुपेकर मॅडम, भांगे मॅडम, मोराळे सर, पवार सर, खाडे सर, डेंगळे सर, नवले मॅडम, चोले सर, सानप सर, धस सर, मुंडे सर, पाटील सर आदी शिक्षक उपस्थित होते. वर्षा वाडेकर व कीर्तीवर्धन तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी भावनिक होऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.