
Ration eKYC: मोफत धान्य घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक; ‘या’ तारखेच्या आत केवायसी करा अन्यथा धान्य होणार बंद!
Ration eKYC: मोफत धान्य घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक; ‘या’ तारखेच्या आत केवायसी करा अन्यथा धान्य होणार बंद!
पुणे: स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य मिळत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणार नाही, त्यांचे धान्य बंद होणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाऊन 31 ऑक्टोबर पूर्वी ई-केवायसी करावी, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच ई-केवायसी अभावी कार्ड बंद पडल्यास अथवा धान्यापासून वंचित राहिल्यास स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा विभाग अथवा परिमंडळ कार्यालय जबाबदार रहाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी.
दुसऱ्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा राज्यातील लाभार्थी कार्डधारक देशभरात कोठेही आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ईकेवायसी करुन घेऊ शकतात. रेशनकार्ड वर जेवढी नावे आहेत त्यासर्वांची ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ईकेवायसी करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने आधार कार्ड, आधार नंबर किंवा मोबाईल मध्ये आधार कार्ड फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. नागरिकांनी रेशन दुकानात जाऊन तातडीने ईकेवायसी करुन घ्यावी असे आवाहन पुणे शहर ‘म’ विभागाच्या परिमंडळ अधिकारी पल्लवी सपकाळे व अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केले आहे.