
सावधान! खोटे उत्पन्न दाखवून शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेताय? लाभार्थ्यांची होणार पडताळणी;अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आदेश जारी; खोटी माहिती देणारांवर होणार कायदेशीर कारवाई
सावधान! खोटे उत्पन्न दाखवून शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ घेताय? लाभार्थ्यांची होणार पडताळणी;अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आदेश जारी; खोटी माहिती देणारांवर होणार कायदेशीर कारवाई
पुणे:
अन्नधान्य वितरण विभागाने रास्त भाव दुकान चालकांची तातडीने बैठक घेऊन याबाबत शासनाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक रास्त भाव दुकान चालकांकडे याबाबतच्या सर्वेक्षणाचे फॉर्म देण्यात आले असून धान्य घेण्यापूर्वी याच महिन्यात लाभार्थ्यांनी हा फॉर्म भरुन त्यात नमूद कागदपत्रे सोबत जोडून द्यायची आहेत.
ज्या रास्त भाव दुकानात लाभार्थ्याचे नाव जोडलेले आहे तेथे सदर फॉर्म भरुन द्यायचा आहे. तसेच फॉर्म भरताना खरी व वस्तुनिष्ठ माहिती नमूद करायची आहे. खोटी माहिती भरुन दिल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान यामुळे बोगस लाभार्थी कमी होणार असून खऱ्या गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
“अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत शासन परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आज दि 9 एप्रिल 2025 रोजी रास्तभाव दुकानदार यांची बैठक घेऊन सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. धान्य वाटपावेळी लाभार्थी नागरिकांना अर्ज देऊन भरून घेतले जाणार आहेत. आवश्यक कागद पत्राची पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द केल्या जातील तसेच नागरिकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबत चुकीची अथवा खोटी माहिती दिल्यास त्यांच्या विरूद्ध कारवाई केली जाईल. आवश्यक तिथे पोलिस विभागाची मदत घेतली जाणार आहे.” डॉ. पल्लवी सपकाळे, परिमंडळ अधिकारी म- विभाग, पुणे.
