![](https://theinvestigationexpress.com/r3e/uploads/2020/10/feturedimagee-780x470.jpg)
GBS चा दुसरा बळी; सिंहगड रोड परिसरात खळबळ
GBS चा दुसरा बळी; सिंहगड रोड परिसरात खळबळ
सिंहगड रोड: सिंहगड रोड परिसरातील नांदेड, किरकटवाडी नांदोशी-सणसनगर, धायरी भागात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराने थैमान घातले असून या आजाराने दुसरा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. नांदेड फाटा येथील विहिरीतून पाणीपुरवठा होणाऱ्या एका गावातील पंचावन्न वर्षीय महिलेचा काल ससून रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
डीएसके विश्व येथील CA चा GBS आजाराने सोलापूर येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता जवळच्याच गावातील महिलेचा मृत्यू झाला आहे. संबंधित महिलेला जुलाब, उलट्यांनी अशक्तपणा आल्याने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अखेर तीचा मृत्यू झाला आहे.