
Nanded city police station:छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त; नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत चार अधिकारी व छत्तीस कर्मचारी तैनात; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त; नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत चार अधिकारी व छत्तीस कर्मचारी तैनात; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांची माहिती
खडकवासला: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, धायरी व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून चार अधिकारी व छत्तीस पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.
खडकवासला धरण चौक व दळवी वस्ती फाटा अशा दोन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून किरकटवाडी फाटा येथेही फिक्स पॉईंट लावण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने व हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी पूर्ण खबरदारी नांदेड सिटी पोलीसांनी घेतली आहे.
हद्दीत चार अधिकारी व छत्तीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून गस्तीची वाहनेही सतत लक्ष ठेवून असणार असल्याची माहिती नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.