
सिंहगड रोड वाहतूक शाखेला वाहतूक नियमनासाठी बॅरिकेड्स भेट; श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशनचा पुढाकार
सिंहगड रोड वाहतूक शाखेला वाहतूक नियमनासाठी बॅरिकेड्स भेट; श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशनचा पुढाकार
पुणे: सिंहगड रोड वाहतूक विभागाला वाहतूक नियमनासाठी बारा बॅरिकेड्स भेट देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष भरत भुरट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते हे बॅरिकेड्स वाहतूक पोलीसांकडे सुपुर्द करण्यात आले.
आमदार भिमराव तापकीर यांनी यावेळी वाहतूक नियोजन व नियमनाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व समस्या सोडविण्यासाठी असे उपक्रम यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे श्री वर्धमान मानव सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष भरत भुरट यांनी सांगितले. यावेळी फाऊंडेशन चे पदाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे, नागरिक उपस्थित होते.