♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

GBS Outbreak: पालिका आयुक्तांकडून नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर, धायरी परिसरात पाहणी; तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना; आजार पसरण्याचे नेमके कारण काय?

GBS Outbreak: पालिका आयुक्तांकडून नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर, धायरी परिसरात पाहणी; तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना; आजार पसरण्याचे नेमके कारण काय?

 

किरकटवाडी: मागील काही दिवसांपासून किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, सणसनगर व धायरी या भागात जुलाब -उलट्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत सगळ्यात अगोदर द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याबाबत निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान या परिसरात ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ हा दुर्मिळ आजार पसरल्याचे उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून पालिका आयुक्त राजेंद्र भोसले व अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सर्व संबंधित विभागागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली.

नांदेड फाट्याजवळ असलेल्या विहिरीतून नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर या गावांना पाणीपुरवठा केला जातो. आयुक्तांनी विहिरीची पाहणी करुन विहिरीला तातडीने संरक्षक जाळी बसवून घेण्याच्या व नियमित पाणी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या ब्लिचिंग पावडरचे प्रमाण योग्य ठेवावे याबाबतही निर्देश दिले.

अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जातात तेथे ड्रेनेज साचलेले असून तेच दुषित पाणी पिण्याच्या लाईन मध्ये जाते याकडे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यानुसार आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नांदोशी व किरकटवाडी येथील अशा ड्रेनेजचे डबके साचलेल्या ठिकाणांची पाहणी केली व संबंधित ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. धायरी व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचीही आयुक्तांनी पाहणी केली. तेथील विहिरीच्या परिसरात अस्वच्छता व सांडपाण्याची दुर्गंधी पसरलेली होती.

किरकटवाडी येथील गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या घराच्या परिसराचीही आयुक्तांनी पाहणी केली व आजार पसरण्याची कारणे जाणून घेतली. परिसरातील सर्व गावांमध्ये सध्या जुलाब -उलट्यांनी थैमान घातले असल्याचे व दुषित पाण्यामुळे हे होत असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना सांगितले. त्यानुसार तातडीने आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. यावेळी खडकवासला गावचे माजी सरपंच सौरभ मते, किरकटवाडीचे माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे, मनसेचे नेते रमेश करंजावणे, माजी उपसरपंच किरण हगवणे, नांदेड येथील रुपेश घुले, जीवन देडगे, राहुल घुले, अविनाश लगड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल पोकळे, काकासाहेब चव्हाण, किरकटवाडीचे माजी सरपंच गोकुळ करंजावणे यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

आजार पसरण्याचे नेमके कारण काय?

दरम्यान पाण्याची तपासणी केली असून त्याबाबतचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना दिली. जर पाण्याचे रिपोर्ट नॉर्मल असतील तर मग या भागात जुलाब, उलटी, थकवा येणे, हातपाय थरथरणे अशी लक्षणे कशामुळे दिसून येत आहेत याचे उत्तर मात्र अद्याप पालिका प्रशासनाला देता आलेले नाही. सध्या या भागात जवळपास प्रत्येक घरात अशा तक्रारी दिसून येत आहेत. त्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न करुन हे आजार पसरण्याची कारणे शोधून काढणे आवश्यक आहे.

 

पालिका जबाबदारी झटकतेय का?

जुलाब, उलट्या हे आजार मुख्यत्वे दुषित पाण्यामुळे पसरतात हे स्पष्ट असताना व या परिसरात घरोघरी असे रुग्ण असताना पालिका आयुक्त मात्र जबाबदारी झटकताना दिसत आहेत. नेमके पाण्यामुळेच असे होतेय का? असे आयुक्तांचे म्हणणे असल्याने पालिका जबाबदारी झटकतेय असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दोन्ही विहिरींचा परिसर, दुर्गंधी, सांडपाणी, पाण्याची गुणवत्ता हे सर्वसामान्य नागरिकाने पाहिले तरी चांगले नाही असे दिसून येत आहे. मग अधिकाऱ्यांना हे का दिसत नाही? याबाबत सर्व संबंधित विभागागांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

preload imagepreload image
03:10