विचारांची भिमजयंती: खडकवासला, एनडीए गेट येथील आदिवासी कातकरी कुटुंबाना किराणा मालाचे किट वाटप; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्सव समिती, अखिल जे.पी. नगर फ्रेंड्स गृपचा पुढाकार
विचारांची भिमजयंती: खडकवासला, एनडीए गेट येथील आदिवासी कातकरी कुटुंबाना किराणा मालाचे किट वाटप; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्सव समिती, अखिल जे.पी. नगर फ्रेंड्स गृपचा पुढाकार
खडकवासला
खडकवासला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महाउत्सव समिती च्या वतीने खडकवासला येथील आदिवासी कातकरी वस्तीवर किराणा मालाचे किट व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक महिलांची विशेष उपस्थिती होती. या समीतीच्या वतीने मागील चार वर्षांपासून अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
अखिल जयप्रकाश नारायण नगर फ्रेंड्स गृपच्या तरुण सदस्यांनी एनडीए गेट जवळील 13 आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा मालाचे किट व मुलांना खाऊ वाटप केले. आपले वाढदिवस व यापुढे दरवर्षी अशाप्रकारे भिमजयंती साजरी करण्याचा निर्णय यावेळी उपस्थित तरुणांनी घेतला. ज्येष्ठ कातकरी महिला विमलबाई वाघमारे यांनी किराणा मालाचे किट दिल्याबद्दल तरुणांचे आभार मानले.