
सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिर परिसरातील वन तळ्यांची दुरुस्ती; मागील वर्षीच्या अनुभवामुळे अधिकारी सतर्क;वन्य प्राणी-पक्षांना दिलासा
सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिर परिसरातील वन तळ्यांची दुरुस्ती; मागील वर्षीच्या अनुभवामुळे अधिकारी सतर्क;वन्य प्राणी-पक्षांना दिलासा
सिंहगड
उन्हाळ्यात वन्य प्राणी व पक्षांची तहान भागावी म्हणून वन विभागाने काळूबाई मंदिर परिसरात दोन वर्षांपूर्वी वन तळे बांधून घेतले आहेत. मागील वर्षी तीव्र उन्हाळा असतानाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वन तळ्यांकडे दुर्लक्ष केले होते. कोरडेठाक पडलेल्या वन तळ्यांच्या भोवती घिरट्या घालून तहानेने व्याकूळ झालेले वन्य प्राणी परत फिरत होते. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने प्रत्यक्ष पाहणी करुन याबाबत ग्राऊंड रिपोर्टींग करत वन विभागाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर सदर वन तळ्यांमध्ये पाणी टाकण्यास सुरुवात झाली होती.
सध्याही उन्हाच्या झळा वाढू लागल्याने द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने वन तळ्यांची पाहणी केली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत दुरुस्ती करुन घेतल्याचे दिसून आले. तसेच टॅंकरने पाणी आणून टाकण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. नकारात्मक बातमी आल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा स्वतःहून कर्तव्य पार पाडल्याबद्दल द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या वतीने अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. अधिकाऱ्यांनीही द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस संवेदनशीलपणे सामाजिक विषयांबाबत लक्ष ठेवून असल्याबाबत कौतुक केले.
“दोन्ही वन तळ्यांची दुरुस्ती करुन घेण्यात आली आहे. टॅंकर येण्यात अडचणी येत असल्याने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करुन घेण्यात आला आहे. वन तळ्यांमध्ये नियमित पाणी राहील याची दक्षता घेतली जाणार आहे. ” समाधान पाटील, वनपाल, खानापूर