
Breaking news: सेल्फी काढताना घसरलेल्या मैत्रिणींना वाचवायला गेला आणि गमावला जीव; पानशेत धरणाजवळील धक्कादायक घटना
पुणे
ज्ञानेश्वर मनाळे हा तरुण आज सुट्टी असल्याने इतर तीन मित्र व तीन मैत्रिणींसह पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास सर्वजण पानशेत धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलाजवळ पाण्याच्या कडेला उभे राहून सेल्फी काढत होते. त्याचवेळी दोघीजणी घसरुन पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी ज्ञानेश्वरने पाण्यात उडी घेतली परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक व पर्यटकांनी दोघींना सुखरूप पाण्याबाहेर काढले. पाणी खोल असल्याने ज्ञानेश्वर चा अद्याप शोध लागला नसून आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, चोंडे,
संदीप सोलसकर
आबाजी जाधव व अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणजितसिंह पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंकज मोघे व पोलीस कॉन्स्टेबल कांतिलाल कोळपे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही करत आहेत.