
Criminal Arrested: मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्याला नांदेड सिटी पोलीसांकडून अटक; बुलेट आणि रिक्षा केली जप्त
Criminal Arrested: मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्याला नांदेड सिटी पोलीसांकडून अटक; बुलेट आणि रिक्षा केली जप्त
पुणे
नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्हींची पडताळणी करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवाजी क्षीरसागर व उत्तम शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार तपास करत असताना सीसीटीव्हीत आढळून आलेला संशयित नांदेड फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अतुल भोस यांना कळविण्यात आले. योग्य खातरजमा करुन पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या संबंधित अंमलदारांनी आरोपी आनंद अशोक जगताप याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून दोन वाहने त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.
पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवाजी क्षीरसागर, उत्तम शिंदे, किशोर शिंदे, राजू वेगरे, निलेश कुलथे, भिमराज गांगुर्डे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, अक्षय जाधव, प्रथमेश गुरव, प्रशांत काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नांदेड सिटी पोलीस पुढील तपास करत आहेत.