♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला अटक; नांदेड सिटी पोलिसांची कारवाई

सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला अटक; नांदेड सिटी पोलिसांची कारवाई

 

पुणे : एन.डी.पी.एस. (NDPS) व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. बाळू उर्फ आकाश जगन्नाथ वाघमोडे (वय 33 रा. रपटेल चौक, टॉवर गल्ली, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

आरोपी बाळू वाघमोडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. त्याचा शोध घेऊन अटक करण्याबाबत वरिष्ठांकडून पोलिसांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, पोलीस अंमलदार स्वप्निल मगर व निलेश कुलथे यांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.

 

आरोपी कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदेड सिटी पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वरील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, स्वप्निल मगर, निलेश कुलथे, अक्षय जाधव, संग्राम शिनगारे, उत्तम शिंदे, शुभम चव्हाण, मनोहर खराडे, सतीश खोत, दीपक कांबळे, राजू वेगरे आणि शिवाजी क्षीरसागर यांनी केली

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles