♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

किरकटवाडीत सराईत गुन्हेगारांचा हैदोस; तरुणावर कोयत्याने हल्ला, एटीएमसह किराणा दुकानाची तोडफोड; नांदेड सिटी पोलिसांकडून दोघांना अटक

किरकटवाडीत सराईत गुन्हेगारांचा हैदोस; तरुणावर कोयत्याने हल्ला, एटीएमसह किराणा दुकानाची तोडफोड; नांदेड सिटी पोलिसांकडून दोघांना अटक

किरकटवाडी : किरकटवाडी आणि खडकवासला परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री दहाच्या सुमारास सराईत गुन्हेगारांनी ओळखीच्या तरुणावर कोयत्याने हल्ला करत एटीएम आणि किराणा दुकानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. रहदारी सुरू असतानाच भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 344/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील लव शामराव कुराडकर (वय 25, रा. लेन क्रमांक 4, कोल्हेवाडी, पुणे) आणि रोहित कैलास आढाव (वय 20, रा. कात्रज, पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याने रक्ताचा सडा पडल्याचे, तसेच एटीएम आणि किराणा दुकानाची तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. भररस्त्यात अशा प्रकारे हैदोस घातला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

किरकटवाडी, खडकवासला परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles