♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकी रायडरची जोरदार धडक; आंबी येथील नागरिकाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी पुणे-पानशेत रस्त्यावर सोनापूर गावच्या हद्दीत अपघात; जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्यास विलंब

चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकी रायडरची जोरदार धडक; आंबी येथील नागरिकाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
पुणे-पानशेत रस्त्यावर सोनापूर गावच्या हद्दीत अपघात; जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्यास विलंब

पुणे : पुणे-पानशेत रस्त्यावर सोनापूर गावच्या हद्दीत चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत आंबी येथील एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. रामदास निवंगुणे असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. रविवारी (दि. 15) हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास निवंगुणे हे पत्नीसह एका कार्यक्रमासाठी आपल्या गावी आंबी येथे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी सोनापूर गावच्या हद्दीत समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रामदास निवंगुणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या अपघातामुळे पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles