♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खडकवासला धरणामागे कालव्याच्या संरक्षक भिंती पडल्या; अपघाताचा धोका वाढला रब्बी आवर्तनामुळे कालवा दुथडी भरून वाहतोय; भारत गॅस कार्यालयासमोर धोकादायक परिस्थिती

खडकवासला धरणामागे कालव्याच्या संरक्षक भिंती पडल्या; अपघाताचा धोका वाढला
रब्बी आवर्तनामुळे कालवा दुथडी भरून वाहतोय; भारत गॅस कार्यालयासमोर धोकादायक परिस्थिती

पुणे: खडकवासला धरणामागील कालव्याच्या संरक्षक भिंती ठिकठिकाणी पडल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या रब्बी आवर्तन सुरू असल्याने कालवा दुथडी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत कालव्याच्या कडेला संरक्षक भिंत नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

खडकवासला येथील भारत गॅस कार्यालयासमोर तसेच त्यापुढील भागात कालव्याची संरक्षक भिंत पडलेली दिसून येत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळी वातावरणात पडलेल्या भिंतीमुळे कालव्याचा काठ लक्षात न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

कालवा सध्या पाण्याने भरलेला असल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. एखादे वाहन नियंत्रण सुटून कालव्यात कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संरक्षक भिंत पडलेल्या ठिकाणी तातडीने बॅरिकेडिंग करणे, धोकादायक भागाची पाहणी करणे आणि संरक्षक भिंतीची कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

या गंभीर परिस्थितीकडे पाटबंधारे विभाग आणि पुणे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना होण्यापूर्वीच धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles