♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रयेजा सिटी अंडरपासच्या कामामुळे सिंहगड रोडवरील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

प्रयेजा सिटी अंडरपासच्या कामामुळे सिंहगड रोडवरील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

सेंट हेलिअस स्कूल आणि मधुकोश सोसायटी मार्गे वाहतूक वळविणार; 19 नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत बदल लागू

 

पुणे : सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत प्रयेजा सिटी अंडरपासचे काम सुरू करण्यात येणार असल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील प्रयेजा सिटी सर्कल अंडरपासचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) करण्यात येत आहे. या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी यासंदर्भात वाहतूक बदलाचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 19 नोव्हेंबर 2026 पासून पुढील आदेश मिळेपर्यंत प्रयेजा सिटी अंडरपास परिसरातील वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येणार आहे.

 

वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे :

1. सनसिटीकडून प्रयेजा सिटीकडे जाणारी वाहतूक सेंट हेलिअस स्कूल मार्गे वळविण्यात येणार आहे.

2. प्रयेजा सिटीकडून शरद हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक मधुकोश सोसायटी मार्गे वळविण्यात येणार आहे.

 

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles