♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंहगडावर गंभीर घटनांची मालिका; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उपद्रव शुल्काच्या नावाखाली लाखो रुपयांची वसुली; मग संपूर्ण सिंहगडावर CCTV कॅमेरे बसविण्यास प्रशासनाची टाळाटाळ का?

सिंहगडावर गंभीर घटनांची मालिका; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
उपद्रव शुल्काच्या नावाखाली लाखो रुपयांची वसुली; मग संपूर्ण सिंहगडावर CCTV कॅमेरे बसविण्यास प्रशासनाची टाळाटाळ का?

 

(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे : ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर मागील काही काळापासून सातत्याने गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किल्ल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी देखरेख यंत्रणा असणे आवश्यक असतानाही संपूर्ण सिंहगडावर अद्याप पुरेशा प्रमाणात CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.
अलीकडेच आठ वर्षांच्या चिमुकलीने परिधान केलेल्या कपड्यांवरून काही तथाकथित धर्मरक्षकांनी केलेल्या गुंडगिरीच्या प्रकारामुळे सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पर्यटनस्थळी कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नसताना अशा प्रकारच्या घटना घडणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.

यापूर्वीही सिंहगडावर सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी वन विभागाने लाखो रुपये खर्च करून बसविलेल्या स्वच्छता उपकरणांची चोरी करण्यात आली होती. चोरी केलेले साहित्य भंगारात विकण्यात आल्याचे समोर आले होते. यामुळे किल्ल्यावर असलेल्या महत्त्वाच्या साधनसामग्रीच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

याशिवाय एका पर्यटकाने आत्महत्या केल्याचा बनाव करून संपूर्ण यंत्रणेला कामाला लावल्याची घटनाही घडली होती. तसेच काही दिवसांपूर्वी धार्मिक द्वेष पसरविणारा फलक लावण्यात आला होता. अशा प्रकारच्या घटनांमुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आणि घटनांवर नजर ठेवण्यासाठी CCTV यंत्रणा किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होते.

सिंहगडावर दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. प्रवेश अथवा उपद्रव शुल्काच्या माध्यमातून प्रशासनाकडे लाखो रुपयांचा महसूल जमा होत असल्याचा दावा केला जातो. मग या महसुलातून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक CCTV यंत्रणा उभारण्यास अडचण नेमकी काय आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

संपूर्ण किल्ला परिसरातील प्रवेशद्वारे, प्रमुख मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भाग CCTVच्या निगराणीखाली आणल्यास गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासोबतच एखादी घटना घडल्यानंतर आरोपी किंवा संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्यासही मदत होऊ शकते.

सिंहगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून ऐतिहासिक वारसा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. गंभीर घटना घडल्यानंतरच जागे होण्याऐवजी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी करणार? लाखो रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या वन विभागाचे आणि संबंधित प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?
सिंहगडावर तातडीने सर्वंकष सुरक्षा ऑडिट करून संपूर्ण किल्ला परिसरात CCTV कॅमेरे बसवावेत आणि त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles