♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दिवाळीच्या सुट्टीसाठी मामाकडे गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू; वरदाडे येथे दुचाकी-टेंपोची धडक पुणे-पानशेत रस्त्यावर भीषण अपघात; धडकेनंतर टेंपो पलटी, रिंग रोडच्या अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप

दिवाळीच्या सुट्टीसाठी मामाकडे गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू; वरदाडे येथे दुचाकी-टेंपोची धडक
पुणे-पानशेत रस्त्यावर भीषण अपघात; धडकेनंतर टेंपो पलटी, रिंग रोडच्या अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप

पुणे : दिवाळीच्या सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या १३ वर्षीय मुलाचा पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी आणि टेंपो यांच्यात झालेल्या धडकेत टेंपो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या अपघातात साईराज आबेश कोंढाळकर (वय १३, रा. सणसनगर, ता. हवेली, जि. पुणे) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, अपघात झालेल्या ठिकाणी रिंग रोडचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अनेक दिवसांपासून रस्ता खोदून ठेवला असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे एका बाजूनेच वाहतूक सुरू असून, या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अर्धवट कामामुळे आणखी किती बळी जाणार?

रिंग रोडच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवल्यानंतर वाहतुकीचे योग्य नियोजन, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे फलक लावण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व ठेकेदाराची आहे. मात्र, अनेक दिवसांपासून काम अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता या गंभीर अपघाताची प्रशासन आणि पोलीस यंत्रणा दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles