♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पुणे महापालिकेचा सावळागोंधळ! निरुपयोगी ड्रेनेज लाईनच्या चेंबर दुरुस्तीसाठी लाखोंची उधळपट्टी; अधिकारी झोपा काढताहेत का? किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील प्रकार; निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही दिवसांतच चेंबरची दुरवस्था, पुन्हा दुरुस्तीचा घाट

पुणे महापालिकेचा सावळागोंधळ! निरुपयोगी ड्रेनेज लाईनच्या चेंबर दुरुस्तीसाठी लाखोंची उधळपट्टी; अधिकारी झोपा काढताहेत का?
किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील प्रकार; निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही दिवसांतच चेंबरची दुरवस्था, पुन्हा दुरुस्तीचा घाट

किरकटवाडी : पुणे महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना किरकटवाडी गावच्या हद्दीत पाहायला मिळत आहे. किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बंद असलेली आणि आजपर्यंत प्रत्यक्ष वापरातच न आलेली ड्रेनेज लाईन अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे या निरुपयोगी ड्रेनेज लाईनच्या चेंबर दुरुस्तीच्या नावाखाली पुणे महापालिकेत गावाचा समावेश झाल्यापासून सातत्याने लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे वापरातच नसलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी वारंवार निधी खर्च करण्यामागचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या ड्रेनेज लाईनची रचना पाहता ती दोन्ही बाजूंनी बंद असल्याने तिचा प्रत्यक्ष वापर कसा होणार, हा मूलभूत प्रश्न आहे. असे असतानाही संबंधित चेंबरच्या दुरुस्तीची कामे वारंवार हाती घेतली जात आहेत. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली निधी खर्च केला जात आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

निकृष्ट कामामुळे काही दिवसांतच जैसे थे परिस्थिती!

या दुरुस्तीच्या कामांच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चेंबर दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याने अवघ्या काही दिवसांतच त्याचे तुकडे होऊन पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केला जातो. त्यामुळे कामाचा दर्जा, ठेकेदाराची जबाबदारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाणारी तपासणी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू!

सध्या याच ड्रेनेज लाईनच्या चेंबर दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. प्रत्यक्षात वापरात नसलेल्या ड्रेनेज लाईनवर वारंवार खर्च होत असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती नाही का? यापूर्वी केलेल्या कामांचा दर्जा तपासला जात नाही का? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

पुणे महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आतापर्यंत झालेल्या खर्चाची चौकशी करावी. ड्रेनेज लाईन प्रत्यक्षात वापरात आहे की नाही, दुरुस्तीची कामे कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आली, संबंधित कामांची बिले कोणत्या आधारावर अदा करण्यात आली आणि कामांचा दर्जा कोणी तपासला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अन्यथा सार्वजनिक निधीच्या अशा खर्चाला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles