♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मुलाच्या विवाहानिमित्त पोलीस उपअधीक्षक अशोक शेळके यांच्याकडून आदिवासी कातकरी महिलांना साडी वाटप

मुलाच्या विवाहानिमित्त पोलीस उपअधीक्षक अशोक शेळके यांच्याकडून आदिवासी कातकरी महिलांना साडी वाटप

एनडीए गेटजवळील कातकरी वस्तीत सामाजिक जाणीवेतून राबविला उपक्रम; शेळके आणि होळकर परिवारात उद्या स्नेहबंध जोडले जाणार

 

खडकवासला : मुलाच्या विवाहाचा आनंद समाजातील वंचित घटकांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने पोलीस उपअधीक्षक अशोक शेळके यांनी सामाजिक जाणीवेतून एक स्तुत्य उपक्रम राबविला. एनडीए गेटजवळील आदिवासी कातकरी वस्तीतील महिलांना त्यांच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कातकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

 

शेळके आणि होळकर या दोन परिवारांमध्ये उद्या विवाहसोहळ्याच्या माध्यमातून स्नेहबंध जोडले जाणार आहेत. घरातील आनंदाच्या या मंगलमय प्रसंगी समाजातील गरजू आणि वंचित घटकांचाही आनंदात सहभाग असावा, या भावनेतून अशोक शेळके यांनी साडी वाटपाचा उपक्रम आयोजित केला.

 

विवाहासारख्या कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी केवळ स्वतःच्या कुटुंबापुरता आनंद मर्यादित न ठेवता आदिवासी कातकरी महिलांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एनडीए गेटजवळील कातकरी वस्तीत महिलांना साड्या देण्यात आल्या. साड्या मिळाल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.सामाजिक बांधिलकी जपत कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक उपक्रमाची जोड देण्याचा शेळके परिवाराचा हा प्रयत्न इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles