♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दोन गावठी पिस्तूलांसस दोघे जेरबंद; नांदेड सिटी पोलिसांची कारवाई; बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविणार; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांची माहिती

दोन गावठी पिस्तूलांसस दोघे जेरबंद; नांदेड सिटी पोलिसांची कारवाई; बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविणार; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांची माहिती

पुणे : नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पेट्रोलिंगदरम्यान केलेल्या कारवाईत एका संशयित तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले होते. या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी एका तरुणाकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पेट्रोलिंग सुरू असताना संशयित इसम अनिल प्रकाश लोहबंदे (वय 20, रा. धायरी, पुणे) याची तपासणी केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/2026 अन्वये आर्म्स ॲक्ट कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)/135 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वैभव महादेव पोळेकर (वय 21, रा. धायरी, पुणे) याच्याकडून आणखी एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली.

या कारवाईमुळे पोलिसांनी आतापर्यंत दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सदर शस्त्रे व काडतुसे कोणत्या उद्देशाने बाळगण्यात आली होती, तसेच या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles