♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

PMC:गरीब गरजू महिला व बेरोजगार तरुणांकडून आठ दिवस घान काढून घेतली आणि आज कामावरून कमी केले 

PMC:गरीब गरजू महिला व बेरोजगार तरुणांकडून आठ दिवस घान काढून घेतली आणि आज कामावरून कमी केले 

(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे: पुणे महापालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या धायरी येथील धारेश्वर आरोग्य कोठी अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे 40 पेक्षा जास्त गरीब गरजू महिला व तरुण बेरोजगांवर ठेकेदाराच्या मनमानीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.

मागील आठ दिवसांपासून या सर्व महिला व तरुण कामगार परिसरात साचलेली घाण काढत होते. कचऱ्याचे ढीग उचलत होते. त्यांचे दररोज हजेरी घेतली जात होती. काम करत असतानाचे फोटो काढून पाठवले जात होते.

आज सकाळी मात्र हे सर्व कामगार नियमितपणे कामावर गेले असता त्यांना अचानकपणे कामावरून काढून टाकले असल्याचे समजले. त्यांच्या जागी दुसऱ्या कामगारांना भरले असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

सिद्धिविनायक कार्पोरेट या कंपनीकडे कचरा उचलण्याचे टेंडर देण्यात आलेले असल्याचे या महिलांनी सांगितले. या कंपनीने आठ दिवस घाण साफ करून घेतली व अचानक कामावरून कमी केले.

पुणे महापालिकेने कचरा उचलण्यासाठी खाजगीकरणाचा घातलेला घाट ठेकेदारांना करोडो रुपये व अधिकाऱ्यांना टक्केवारी देणार आहे. मात्र अशा गरीब गरजू महिला, बेरोजगार तरुण यांच्या ताटातील भाकर मात्र हिरावून घेणार आहे.

दुसरे कामगार भरायचे होते तर या कामगारांकडून आठ दिवस काम का करून घेतले? मोठ्या प्रमाणात साठलेली घाण साफ करून घेण्यासाठी या कामगारांची फसवणूक करून जाणीवपूर्वक यांचा वापर करून घेण्यात आला का?

मोठ्या आशेने कामावर आलेल्या महिला व तरुणांच्या डोळ्यांतील पाण्याची किंमत ठेकेदार आणि कमिशनखोर अधिकारी यांना काय दिसणार? या कामगारांची अशी फसवणूक योग्य नाही. या कामगारांना न्याय मिळायला हवा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles