♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; तीन गावठी पिस्तूलांसह चार जिवंत काडतुसे जप्त

अंबेगावात गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; तीन गावठी पिस्तूलांसह चार जिवंत काडतुसे जप्त

(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे : अंबेगाव परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर गावठी पिस्तुलाने गोळीबार करणाऱ्या आरोपींना अंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 1.30 वाजता अंबेगाव बुद्रुक येथील हरणाई कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये फिर्यादी यांच्या मुलाच्या दिशेने जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबार करण्यात आला. आरोपींनी गावठी पिस्तुलातून दोन राऊंड फायर केल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 380/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, आर्म्स अॅक्ट कलम 3(25), 3(27) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच आरोपींच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्यांचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी दक्षिण हॉटेल रोड, जांभुळवाडी, पुणे परिसरात मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून एकूण तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या कारवाईत शिवदत्त उर्फ सोन्या हरिकाका कोंढरे (वय 23), सुरज सुभाष डिंबळे (वय 23), अतिश उमेश मोरे (वय 28) आणि ऋत्विक (वय 24) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 14 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles