
‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीचा परिणाम; सिंहगड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लागला नांदेड सिटी पोलिसांच्या आवाहनाला यश; मृताच्या नातेवाईकांसह पोलिसांकडून ‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’चे आभार
‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीचा परिणाम; सिंहगड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लागला
नांदेड सिटी पोलिसांच्या आवाहनाला यश; मृताच्या नातेवाईकांसह पोलिसांकडून ‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’चे आभार
पुणे : सिंहगड रस्त्यावर मृतावस्थेत आढळलेल्या महादेव श्रीपती काळे यांच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. ‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे लातूर येथे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मदत झाली.
महादेव श्रीपती काळे हे सिंहगड रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत व्यक्तीची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले होते.
या प्रकरणाची बातमी ‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर लातूर येथे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना यश आले.
या कामात नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस अंमलदार संदीप ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस अंमलदार संदीप ढवळे आणि मृताच्या नातेवाईकांनी बातमीच्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल ‘द इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेस’चे आभार मानले.
बातमीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी
एखादी बातमी केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित न राहता गरजू व्यक्तीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम ठरू शकते, याचा प्रत्यय या घटनेतून आला. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लागल्याने या प्रकरणात महत्त्वाचा दुवा जुळला आहे.











